पालघर – पालघर जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. हा स्फोट शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमाराला भोईसर औद्योगिक वसाहतीत घडला.
या प्रकरणाची माहिती मिळताच बाहेरून अग्निशमन दलाचे बंब आणि अन्य मदत यंत्रणा येथे पाचारण करण्यात आली. जखमी झालेले पाचही जण याच कारखान्यातील कामगार आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अजून समजलेली नाही. पण स्फोटामुळे लागलेली आग लगेचच विझवण्यात यश आले. या प्रकारामुळे या औद्योगिक परिसरात मोठीच घबराट पसरली होती. पण सुदैवाने स्फोटाची तीव्रता फार मोठी नव्हती.