जिनेव्हा – जगभरात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटने आता टेन्शन वाढवले आहे. या व्हेरियंटसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली असून धोक्याचा इशारा दिला आहे. जगभरात कोव्हिडची आलेली लाट ही चिंताजन आहेच पण त्यातही आता डेल्टा व्हेरिएन्टमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.
करोनाचे विषाणू काळानुसार सतत बदलत आहेत. डेल्टासारखे रुप तर अधिक धोकादायक असल्याचा इशाराचा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदहानोम गेब्रेयेसस यांनी दिला आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फायझर आणि जॉनसन आणि जॉन्सनची लस डेल्टा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी आहे असा दावा केला जात आहे.
जगभरात लसीकरण मोहीम अजूनही पूर्ण झाली नाही. अनेक भागांमध्ये लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिएंटमुळे करोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. डेल्टा हा अधिक धोकादायक आणि वेगाने पसरणारा असल्याचेही यावेळी सूचित करण्यात आले आहे.
ज्या देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आहेत त्यांना अधिक धोका आहे. कोणताच देशाला धोका कमी नाही. करोनाचं रुप बदलणारं आहे त्यामुळे ते अधिक धोक्याचं असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना हलगर्जीपणा न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.