नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजेंस फर्म ‘माॅर्निंग कंसल्ट’ ने केलेल्या सर्व्हेनूसार, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. मोठी गोष्ट म्हणजे जगातील सर्वात ताकतवान देश अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हे टाॅप 5 मध्येही नाहीत.
नरेंद्र मोदी यांचे ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग ६६ टक्के असून ते अमेरिका, रशिया, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, ब्राझील, जर्मनी सह १३ देशातील नेत्यांपेक्षा अधिक आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींच्या ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग मध्ये थोडी घसरण झाली असली तरी ते टॉपवरच आहेत. अन्य जागतिक नेत्यांच्या तुलनेत मोदी यांची कामगिरी सरस ठरली आहे.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxouZWb
Modi: 66%
Draghi: 65%
López Obrador: 63%
Morrison: 54%
Merkel: 53%
Biden: 53%
Trudeau: 48%
Johnson: 44%
Moon: 37%
Sánchez: 36%
Bolsonaro: 35%
Macron: 35%
Suga: 29%*Updated 6/17/21 pic.twitter.com/FvCSODtIxa
— Morning Consult (@MorningConsult) June 17, 2021
या यादीत दोन नंबरवर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्के, तीन नंबरवर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोप्से ओब्रेडोर ६३ टक्के रेटिंग सह आहेत. चार नंबरवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन ५४ टक्के, जर्मनी चान्सलर अन्जेला मर्केल ५३ टक्के रेटिंग सह पाच नंबरवर आहेत. अमेरिकेचे बायडेन सहा नंबरवर, कॅनडाचे जस्टीन टुडो ४८ टक्के रेटिंग सह सात नंबरवर, युकेचे बोरीस जॉन्सन ४४ टक्के रेटिंग सह आठ नंबरवर, द.कोरियाचे मून जे इन ३७ टक्के रेटिंग सह ९ नंबरवर तर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ १० नंबरवर आहेत.
डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्ट ही रिसर्च कंपनी सातत्याने जगभरातील नेत्यांचे अॅप्रूव्हल रेटिंग ट्रॅक करत असते. काही दिवसांपूर्वीच्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे स्पष्ट झाले आहे.