अहमदाबाद – गुजरातमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना जागीच मृत्यू झाला आहे. आनंद जिल्ह्यातील तारापूर परिसरात हा अपघात झाला आहे.
Gujarat: 10 members of a family, including a child, died in a collision between a car and a truck near Tarapur in Anand district earlier this morning. Police personnel are present at the spot, bodies referred to Tarapur Referral hospital. Police investigation is underway.
— ANI (@ANI) June 16, 2021
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तारापूर येथे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते. सूरतकडून भावनगरला जात असताना हा अपघात झाला. आनंद जिल्ह्यातील तारापूर भागात महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. ट्रक मध्य प्रदेशातील असल्याचे प्राथमिक माहिती द्वारे समोर आले आहे.
कार आणि ट्रक भरधाव वेगाने असल्यामुळे या धडकेत मोठी जिवितहानी झाली. ट्रकची धडक बसताच कारचा चक्काचूर झाली आहे. कारमधील लोक जागेवरच गतप्राण झाले आहेत.