काबूल, ता. 15 – पाक नॅशनल अवामी पक्षाचे चिटणीस जनरल अजमत खटक यांनी एका खास मुलाखतीत असे मत व्यक्त केले की, भुट्टो राजवट आता अशा अवस्थेत पोचली आहे की, त्यामुळे पाकिस्तानचे विघटन अटळ आहे.
पुढील आठवड्यात वीज कपात संपूर्णपणे रद्द होणार
मुंबई – तारापूर अणुशक्ती वीज पुरवठा केंद्राचे जनित्र काम करीत नव्हते तेव्हा ऐच्छिक वीज कपात जारी करण्यात आली होती ती आता रद्द करण्यात येत आहे.
कारण वीज पुरवठा परिस्थिती आता सुधारली आहे. पाऊस चांगला झाला आहे व ट्रॉम्बेमधील वीज पुरवठा 19 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे वीज कपात पुढील आठवड्यात संपूर्णपणे रद्द करण्यात येईल.
अरब व इस्रायलमधील वाद मिटणार म्हणे!
जकार्ता – अरब व इस्रायल या दोन देशातील वाद मिटवण्याची योग्य वेळ आली आहे,’ असे मत इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री आदम मलिक यांनी आज व्यक्त केले. एका वार्ताहरांच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले,
1967 च्या डिसेंबर महिन्याच्या 22 तारखेस सिक्युरिटी कौन्सिलने केलेला ठराव इस्रायलने अमान्य करावा. या करारानुसार इस्रायलने अरबांच्या व्यापलेल्या प्रदेशातून माघार घ्यावी व त्यामुळे बोलणी करण्यास मार्ग खुला होईल!
सरकारी गुदामात तांदुळ साठा नाही
पुणे – सरकारी गोदामात तांदळाचा साठा नसल्याने पुढील आठवड्यात रेशनकार्ड धारकांना तांदूळ मिळेल की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. रेशनिंग दुकानदारांना या विषयी काही सूचना आल्या आहेत, असे कळते.