धनाबाद – झारखंडच्या धनाबाद शहरात एकाच घरातील दाम्पत्य आणि त्यांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. मुन्ना यादव (वय 45), त्याची पत्नी मीना देवी (वय 35), मुलगा राहुल (वय 20) आणि रोहित (वय 14) अशी त्यांची नावे आहेत.
राहुल हा या मीनाचा सावत्र मुलगा आहे. त्यानेच अन्य तिघांची भोसकून हत्या करून नंतर स्वतःही आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाला असावा, अशी आमची प्राथमिक माहिती असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज स्वरगायरी यांनी सांगितले.
मुन्ना यादवची पहिली पत्नी मरण पावली असून, त्याच्यापासून मुन्नाला राहुल हा मुलगा झाला होता. त्यानंतर मुन्नाने मीनाशी लग्न केले. त्यांच्या शेजारच्या इसमांनी सांगितले की, राहुल हा या कुटुंबापासून दूर राहात होता. मागच्याच महिन्यात तो येथे राहायला आला होता. तेव्हापासून त्यांच्या घरात भांडणे होत असत.