पुणे – तंबाखुची पुडी विकत घेण्याच्या कारणावरून जाऊन बारा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणात 30 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के.पोंक्षे यांनी जामीन मंजुर केला आहे.
स्वप्नील बाळासाहेब बंड असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. आनंद बोत्रे, ऍड. किशोर पाटील, ऍड. विराज करचे पाटील आणि ऍड. प्रियांका धुमाळ यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. गुन्हा नोंद असलेल्या पोलीस स्टेशनला सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हजेरी लावणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, पीडित, तिचे कुटुंबिय आणि साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि परवानगीशिवाय महाराष्ट्र न सोडणे, या अटींवर 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
भोर तालुक्यात घडलेल्या घटनेबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. 4 मे रोजी घडलेल्या घटनेबाबत विनयभंग़ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी बंड याला अटक केली आहे. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. आनंद बोत्रे, ऍड. किशोर पाटील, ऍड. विराज करचे पाटील आणि ऍड. प्रियांका धुमाळ यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.