नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
Someone should ask this “Businessman” to go to Any #Covid hospital..stand along with our #Doctor n #frontlineworkers just for 24 hours n then do his “terterter”.Most inhuman, enraging n disgusting.Whose #Toolkit is he? How dare he?@drharshvardhan @MoHFW_INDIA #BabaRamdev pic.twitter.com/zWIaP25Di1
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 24, 2021
सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.
आता अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बाबा रामदेव यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. उर्मिला यांनी ट्विटरवर एक ट्विट करत रामदेव बाबांना चांगलेच फटकारले.
तिने ट्विट केले आहे की,’रामदेव बाबा या बिझनेसमॅनला एखाद्या कोव्हिड रूग्णालयात जायला हवे. कोव्हिड रूग्णालयात डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कसोबत 24 तास उभे राहून मग बयानबाजी करायला हवी. ‘
ते पुढे म्हणाले,’ त्यांनी केलेले विधान संतापजनक तितकेच घृणास्पद वक्तव्य आहे. हे कुणाचे टूलकिट आहे? त्यांची इतकी हिंमत होतेच कशी?’ असे ट्विट उर्मिला यांनी केले. ‘ असं ट्विट करत त्यांनी रामदेव बाबाचा विधानावर संताप व्यक्त केला आहे.
तत्पूर्वी आयएमएने बाबा रामदेव यांच्यावर महामारी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा. त्याचवेळी आपले गुरू रामदेव आणि पतंजली उद्योगावरील होत असलेला लोकांचा हल्ला पाहून आचार्य बालकृष्णदेखील मैदानात उतरले आहेत. बालकृष्ण यांनी योग आणि आयुर्वेद नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा अजब दावा केला आहे.