मुंबई – ‘बिग बॉस 14’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सध्या ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या 11 व्या सिझनमध्ये सहभागी झाली आहे. त्यासाठी निक्की तांबोळी दोन दिवसांपूर्वीच केपटाऊनला रवाना झाली आहे.
‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत लवकरच सुरू होणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार केपटाऊनला गेले आहेत. सालाबाद प्रमाणेच यंदाही या कार्यक्रमाचे होस्ट ‘रोहित शेट्टी’ असणार आहेत.
बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आणि सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव होती.
निक्की तांबोळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करते. अलीकडेच निक्कीने निळ्या रंगाचा स्विमसूट परिधान करून तिच्या परिपूर्ण फिगरचे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये निक्की समुद्रकिनार्यावर पोज आणि धमाल करताना दिसत आहे. या ड्रेस मध्ये निक्की अतिशय ग्लॅमर्स आणि हॉट दिसत असून, तिचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत. फॅन्स तिच्या या फोटोनंतर अक्षरशः हा लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.