मेष : व्यवसायात उतावळेपणा करु नका. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्या. बढती मिळण्याची शक्यता.
वृषभ :आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नोकरदार व्यक्तिंनी सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
मिथुन :ही अपेक्षा करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.
कर्क :महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करु नये. ग्रहांची साथ आहे. त्यामुळे नवीन कामांना गती येईल.
सिंह :व्यवसायात कामात उलाढाल वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरी हातून कौतुकास्पद कार्य घडेल.
कन्या :आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता कळतील. महिलांना घरासाठी नवीन खरेदीचे योग येतील.
तूळ : प्रकृतीची मात्र कुरबुर राहील तरी काळजी घ्या. कलाकार, खेळाडूंना मानसन्मान मिळतील.
वृश्चिक :””आपले काम बरे की आपण बरे” हे धोरण लाभदायी ठरेल. व्यवसायात अनपेक्षित खर्च वाढतील.
धनू :पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत जिभेवर साखर पेरुन बोलावे. फुकटचे सल्ले देऊ नयेत.
मकर : सहकारी कामात मदत करतील. महिलांना खर्चाची हातमिळवणी करताना नाकीनऊ येतील.
कुंभ : बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. अशक्यप्राय कामे शक्य करुन यश संपादन कराल.
मीन :धंदा व्यवसायात कामांना झालेला विलंब आर्थिक फटका देईल. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल.