हिंदी मीडियममधून इरफान खानच्या बरोबर दिसलेली ऍक्ट्रेस माहिरा खान आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. झीच्या “यार जुलाहे’ या नवीन शॉर्ट स्टोरी सीरिजमध्ये ती काही कथांचे अभिवाचन करणार आहे. “यार जुलाहे’ या सीरिजमध्ये 12 कथांचे अभिवाचन काही सेलिब्रिटी करणार आहेत. यामध्ये कथांचे नाट्य रूपांतरही केलेले असेल.
15 मे रोजी “यार जुलाहे’ ची पहिली कथा प्रेक्षकांना दिसणार आहे. यार जुलाहे ही गुलजार यांची एक कविता आहे. “जुलाहे’ याचा अर्थ सूत कातणे. त्याचप्रमाणे कथांची वीण असणार आहे, म्हणून त्याला हे नाव दिले आहे. माहिरा खान “गुडिया’ या कथेचे अभिवाचन करणार आहे. ही कथा अहमद नदीम कासमी यांनी लिहिली आहे.
लहानपणीच्या दोन मैत्रिणी आणि त्यांच्यातील एकीकडे असलेल्या बाहुलीची ही कथा आहे. “यार जुलाहे’मध्ये गुलजार, सआदत हसन मंटो, किस्मत चूकताई, मुंशी प्रेमचंद, अमृता प्रीतम, कुअर्तुल ऐन हैदर, बलवंत सिंग, असद मोहम्मद खान, गुलाम अब्बास, राजिंदर सिंह बेदी आणि इंतजार हुसेन आदी लेखकांच्या कथांचा समावेश असणार आहे.