राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी संपूर्ण मे महिन्यात “फक्त मराठी वाहिनी’च्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. संपूर्ण मे महिन्यामध्ये दररोज एक सुपरहिट चित्रपट “फक्त मराठी वाहिनी’वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. लॉकडाऊन मुळे सगळ्यांना घरात रहावे लागते आहे.
सर्वांवरचा विशिष्ट ताण कमी करण्यासाठी मे महिन्यासाठी जवळपास 30 हून अधिक सुपरहिट चित्रपटांची निवड केली आहे, या लॉकडाऊन स्पेशल महोत्सवामध्ये “फर्जंद’, “तुकाराम’, “दगडी चाळ’, “मोरया’, “शहाणपण देगा देवा’, “राजवाडे आणि सन्स’, “वाय झेड’, “सतरंगी रे’, “तुझं तू माझं मी’ “कॉफी आणि बरंच काही’, “इश्क वाला लव्ह’, “तुझ्याविन मर जावा’, “देवा’, “संदूक’, “मस्का’, “गणवेश’, “गाभ्रीचा पाऊस’, “खेळ मांडला’,
मंकी बात’, “हॉस्टेल डेज’, “आपण यांना पाहिलंत का?’, “जन्मदाता’, “पसंत आहे मुलगी’, “तू तिथं मी’, “कळत नकळत’, “बंदिवान मी या संसारी’, “भेट’, “सर्वसाक्षी’, “सामना’ इत्यादी दर्जेदार सुपरहिट चित्रपटांचा भरगच्च बुके आहे. तसेच “साईबाबा श्रद्धा सबुरी’ आणि “सप्तपदी’ या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.