‘ऑक्सिजनच्या तुटवड्याला फक्त राजकीय नेतेच जबाबदार’

ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून सुनील शेट्टी संतापला

नवी दिल्ली – देशात करोनाचा थैमान थांबायच नाव घेत नाही. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून अनेक कोविड रुग्णाचा मृत्यू होत आहे. याच मुद्यावरून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी संतापला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

सुनील शेट्टीने या आपली भूमिका मांडत ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या मुद्यावर  राजकारण्यांना जबाबदार ठरवलं आहे. वृत्त माध्यमांशी बोलतांना तो म्हणाला आहे की,’जे राजकारणी खुर्चीवर बसतात ते फक्त पुढील पाच वर्षे पैसे कसे कमवायचे याचा विचार करतात. सिस्टमसाठी काय केले पाहिजे याचा विचार ते करतं नाही. त्यात आता एकमेकांवर आरोप करण्याची ही वेळ नाही. या परिस्थितीला फक्त राजकीय नेतेच जबाबदार आहे.” असे तो म्हणाला. 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.