- दिवसभरात 2049 बाधित तर 2482 जण करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. नवीन बाधितांपेक्षा आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरात शुक्रवारी (दि. 30) दिवसभरात 2482 रुग्ण करोनामुक्त झाले. तर नवीन 2049 रुग्णांची भर पडली आहे. तसेच 87 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2 लाख 10 हजार 423 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 30) शहरात 2006 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 43 जण बाधित झाले आहेत. आजपर्यंत शहरातील 2 लाख 10 हजार 423 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 87 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये शहरातील 46 व शहराबाहेरील 41 जणांचा समावेश आहे.
शहरातील पिंपळे सौदागर, चिंचवड, आकुर्डी, चिखली, पिंपळे गुरव, भोसरी, काळेवाडी, तळवडे, रहाटणी, वाकड, सांगवी, दापोडी येथील 46 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील बोपोडी, पुणे, जुन्नर, आळंदी, मांजरी, देहूगाव, शिरोली, रांजणगाव, कात्रज, अहमदनगर, वडगाव शेरी येथील 46 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 4365 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 2926 व शहराबाहेरील 1439 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 2482 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 85 हजार 568 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 11696 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 8371 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 13,558 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 21927 इतकी आहे. आज दिवसभरात 12,911 जणांना लस देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात 24 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 30) 24 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 12 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोनाबाधित रुग्ण हे पिंपरी, कर्वेनगर, पिंपळे निलख, चिंचवड, औंध, नवी सांगवी, देहुरोड, रावेत, पाषाण, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, थेरगाव, कात्रज, जांभुळवाडी, वारजे, ताथवडे, सुसगाव येथील रहिवाशी आहेत. रुग्णालयातून 9 पुरुष आणि 3 महिला रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. इनामगाव (ता. शिरूर), नांदेड सिटी, हडपसर, औंध, नवी सांगवी, वाकड, लोणंद, बिबवेवाडी, मान, हिंजवडी, पिंपळे सौदागर, वानवडी येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयामध्ये सध्या 74 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 51 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 180 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 1 हजार 852 रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. 339 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे.