पुणे – जुन्या भांडणातून एका तरुणावर तिघांनी कोयता व अन्य हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न केला. विकी उर्फ विक्रम सुरेश जमादार (वय 21, रा. मार्केटयार्ड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपाचार सुरू आहेत.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी अरबाज शेख (वय 22), सलमान शेख (वय 20), पिल्या उर्फ सतीश शिससाट (वय 21, सर्व रा. आंबेडकरनगर) यांना अटक केली आहे. याबाबत नंदा जमादार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी रात्री आंबेडकरनगर गल्ली क्रमांक 3 येथे घडली. आरोपी आणि फिर्यादींचा मुलगा यांची भांडणे झाली होती. याच रागातून अरबाज, सलमान व पिल्या यांनी विकीवर प्राणघातक हल्ला केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव करत आहेत.