लंडन – विविध रंगांची ओळख होण्यास अडचण होत असणाऱ्या म्हणजेच रंगांधळा व्यक्तींसाठी ब्रिटिश आणि संयुक्त अरब अमिरात या देशांच्या संशोधकांनी विशेष कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला आहे. अनेक वेळा रंगांधळा व्यक्तींना लाल आणि हिरव्या रंगांमध्ये फरक करता येत नाही. आता या लेन्सचा वापर करून अशा व्यक्ती लाल आणि हिरवा रंग ओळखू शकणार आहेत. या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये गोल्ड नॅनो पार्टिकलचा वापर करण्यात आला आहे.
अबू धाबी येथील खलिफा युनिव्हर्सिटीचे मेकॅनिकल इंजिनिअर अहमद सलीह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रंगांधळा व्यक्ती रंगीत काचेचे चष्मे वापरतात. त्यामुळे रंग ओळखण्यास त्यांना काही प्रमाणात मदत होते. पण अशा प्रकारच्या उपायांमुळेही संपूर्णपणे रंगांची ओळख होऊ शकत नाही. या रोगावर आत्तापर्यंत कोणताच इलाज नव्हता, पण आता या विशेष प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लागल्यामुळे दृष्टिदोष असणाऱ्या व्यक्तींना लाल आणि हिरवा रंग आता ओळखता येणार आहे.
रंग आंधळेपणा का अनुवांशिक असू शकतो. अनेक पिढ्यांमध्ये हा आजार कायम राहतो, पण आता या कॉन्टॅक्ट लेन्सच्या संशोधनामुळे अनेकांना या आजारापासून मुक्ती मिळणार आहे. या संशोधनाची माहिती एस नॅनो जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली असून या कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये कोणत्याही प्रकारच्या हानिकारक केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही असा खुलासा करण्यात आला आहे.