राज्यमंत्री भरणे यांच्या पुत्राने कोरोना रुग्णांसाठी उचलल्या गाद्या !

इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान संकुलात 100 कोरोना रुग्णांना उपचार घेता येणार

इंदापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे हे वयाने अतिशय लहान असताना देखील,सामाजिक जाणिवेतून इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत.व रुग्ण ठणठणीत बरे व्हावेत.याकरिता स्वतः लक्ष घालून इंदापूर शहरातील विद्या प्रतिष्ठान संकुलात शंभर बेडचे अध्यावत कोरोना सेंटर उभारणीत सिंहाचा वाटा देत,चक्क आपण राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे.असा कोठेही मोठेपणा न धरता थेट हे बेड निर्माण करण्यासाठी,गाद्या उचलण्याचे काम व खाटा ठेवण्याचे काम युवकांसमवेत श्रीराज भरणे यांनी करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यात ग्रामीण परिसरात व शहरी भागात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील सर्व रुग्णांना मोफत उपचार कसे मिळतील,याकरता मागील काही दिवसापासून यशस्वी प्रयत्न राज्यमंत्री भरणे करत आहेत. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राज्यमंत्री भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे हे अशा महामारीत देखील कोणत्याही गोष्टीची तमा न करता,कोरोना रूग्णांच्या मदतीला धावून जात आहेत.शुक्रवारी ता.(23 एप्रिल) रोजी चक्क तालुक्यातील युवक वर्ग सोबत घेऊन शंभर बेडचे कोरोना सेंटर श्रीराज भरणे यांनी केले आहे.

या निर्माण झालेल्या शंभर बेड मुळे तालुक्यातील बाधित रुग्णांना योग्य उपचार व चांगली सुसज्ज व्यवस्था निर्माण झालेली आहे. तालुक्यातील कोणत्याही भागातील नागरिकांनी आपले असलेले आजार न लपवता थेट कोरोना चाचणी करून उपचार करून घ्यावेत, उपचारासाठी काही अडचणी आल्यास थेट संपर्क करा असे आवाहन श्रीराज भरणे यांनी केले आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.