मुंबई – प्यार का पंचनामा फेम नुसरत भरूचाला “खिलोना’ या सिनेमामध्ये मोलकरणीचा रोल करावा लागला होता. या रोलचा अभ्यास करण्यासाठी नुसरत भरुचाने घरातल्या कामाची सवय करून घेतली आहे. “खिलोना’ मध्ये तिला बिना मेकअपचे वावरायचे होते.
त्यामुळे तिने मेकअपची सवय देखील सोडून दिली होती, या रोलमध्ये तिला घरातील स्वच्छता करणे. फरशी पुसणे, भांडी घासणे यासारखी कामे करायची होती. म्हणून नुसरतनेही आपल्या घरात ही कामे स्वतःच करायची सवय लावून घेतली होती.
गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात तिने घरगुती काम करण्याचे आपले बरेच व्हिडीओ अपलोड केले होते. घराबाहेर पडण्यावर निर्बंध असल्यामुळे तिला आपल्या पूर्वीच्या अनुभवाचा फायदा घरातच काम करण्यासाठी झाला. तिच्या या सवयीमुळे तिचे घरचे लोक देखील खूप खुश झाले होते. पुन्हा लॉकडाऊन लागल्यावर तिला हाच अनुभव कामी आला आहे.