पुणे – ‘ब्रेक दि चेन’चे निर्बंध कडक करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली आहे.
सध्या पुणे शहरातील अनेक ठिकाणी गरिबांसाठी शिवभोजन थाळी एक वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही.