अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह लवकरचं “दिल है दिवाना’ या गाण्यात दिसणार आहेत. या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. यात अर्जुन आणि रकुल डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलं आहे.
“दिल है दिवाना’ गाण्याचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केलं आहे. या गाण्याला दर्शन रावल आणि जारा खान यांनी आवाज दिला आहे. हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे.
टी-सिरीजच्या बॅनरखाली या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याबद्दल बोलताना भूषण कुमार म्हणतात, दिल है दिवाना हे असे रआशा आहे की, हे गाणे प्रेक्षकांनाही खूप आवडेल. “दिल है दिवाना’ हे गाणे 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.