बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आलियाने करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असलेल्या आलिया भट्टला काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता.
आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती दिली आहे. आलियाने पोस्टमध्ये लिहिले की, असे पहिल्यांदाच झाले आहे की, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही चांगले वाटत आहे. या पोस्टसह तिने एक फोटोही शेअर केला आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलिया भट्टचा “गंगूबाई काठियावाडी’चा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या टीजरला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. याशिवाय आलिया एसएस राजामोली यांच्या “आरआरआर’ आणि अयान मुखर्जी यांच्या “ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसह झळकणार आहे.