भाजप खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना “ब्लड कॅन्सर’ने ग्रासले आहे. या वृत्ताने त्यांच्या परिवाराबरोबरच त्यांचे चाहतेही दु:खी झाले आहेत. किरण खेरला मल्टिपल मिलोमा नावाचा रक्ताचा कर्करोग झाला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील एका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.
या कठीण काळात त्यांचे पती, अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत. सध्या ते आपले सर्व लक्ष किरण खेर यांच्या सेवेत केंद्रित करत आहे. अशी माहिती मिळाली आहे की, अनुपम खेरने आता आपल्या पत्नीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा, यासाठी आपले काम दुय्यम स्थानावर ठेवले आहे.
अनुपम खेर यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसीच्या मालिका “न्यू ऍमस्टरडॅम’ला सध्या निरोप दिला आहे. या मालिकेत ते डॉक्टर विजय कपूरची व्यक्तिरेखा साकारत होते. ही वैद्यकीय नाटक मालिका आहे.