पुणे – अश्लील बोलून प्रेम व्यक्त करणारा संदेश तसेच शायरी असलेली चिठ्ठी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकल्याप्रकरणात 22 वर्षीय तरुणास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अरुणकुमार भगत (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) असे त्याचे नाव आहे.
विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी भगत यास तीन वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद आहे.
25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे घडली. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले.