टोकियो – जपान सरकारने नियुक्त केलेले सहा सदस्यांचे पथक सध्या जपानच्या नव्या सम्राटांचा शोध घेत आहे. या पथकाची शोधमोहीम थांबल्यानंतर जपानला त्यांच्या इतिहासात प्रथमच एक महिला सम्राटपदी उपलब्ध होणार का याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
सध्या सम्राट पदावर विराजमान असलेले नारीहोतो एकसष्ठ वर्षांचे आहेत त्यांना एकच मुलगी आहे. जी प्रिन्सेस ऐको नावाने ओळखली जाते जपानच्या सध्याच्या कायद्याप्रमाणे महिलेला सम्राटपद मिळत नाही. त्यामुळे प्रिन्सेस ऐको हिला सम्राज्ञी पट मिळेल अशी शक्यता सध्या व्यक्त होत नाही. सध्याच्या जपानच्या राजेशाही परिवारा मध्ये एकूण 18 सदस्य आहेत त्या सर्वांची वयोमर्यादा सात ते तीस अशी आहे.
अशा परिस्थितीत सम्राट नारोहितेच्या छोट्या भावाच्या 14 वर्षे मुलाला म्हणजेच होरीहोतो याला सम्राटपद मिळण्याची शक्यता आहे भविष्यात जर या नव्या सम्राटाला मुलगा झाला नाही तर जपानच्या 2600 वर्षाच्या इतिहासात प्रथमच जपानची राजगादी वारसहीन होणार आहे.
1947 मध्ये केलेल्या कायद्याप्रमाणे कोणत्या महिलेला राजगादीवर बसता येत नाही खरेतर यापूर्वी 1762 ते 1771 या कालावधीमध्ये साकुरची नावाची राजेशाही महिला सम्राज्ञीपदी विराजमान झाली होती यावेळी सुद्धा जपानच्या कायद्यात बदल करून सध्याच्या युवराज्ञीला सम्राट पदावर विराजमान करावे असा एक मतप्रवाह आहे.
परंपरावादी लोकांच्या मते जपानच्या सम्राट पदावर एखादी महिला ठेवणे योग्य होणार नाही जपानच्या सध्याच्या राजेशाही परिवारामध्ये जर योग्य व्यक्ती उपलब्ध नसेल तर दूरच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यापैकी योग्य व्यक्तीचा सम्राट पदी राज्याभिषेक करावा असे त्यांचे म्हणणे आहे.
जपानमधील विद्यापीठाने केलेल्या सर्व प्रमाणे देशातील 70 ते 80 टक्के लोकांनी जपानच्या कायद्यामध्ये बदल करून महिलेला जपानच्या सम्राज्ञी पदावर विराजमान करावे असा कौल दिला होता जपानमधील 85 टक्के नागरिकांना सिंहासनावर महिला बसलेली हवी आहे जपानमधील नागरिकांचा असा दबाव वाढत गेल्यास जपानी कायद्यात बदल करण्यात येऊन कदाचित विद्यमान युवराज्ञी कायको हिला सम्राट पदावर बसवले जाण्याची शक्यता आहे.