मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे अभिनेत्री “क्रिती सनॉन’ रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘क्रिती सनॉन’कडे पाहिलं जातं.
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी क्रितीची अनेकांनी तारीफ केली होती.
‘हिरोपंती’ या चित्रपटानंतर तिने ‘बरेली की बर्फी’, ‘स्त्री’, ‘दिलवाले’, ‘कलंक’, ‘लुकाछुपी’, ‘पानीपत’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून क्रितीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
क्रिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्सशी शेअर करत असते. नुकतंच क्रितीने तिच्या इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाचा ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये क्रिती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
उत्तम अभिनयासोबतच क्रितीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. क्रितीच्या लूकवर तिचे फॅन्स कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. शेअर केलेल्या या फोटोला क्रितीने एक कॅप्शन देखील दिलं आहे.
‘Summer is here! Beach hair on point, now just need a beach and a cocktail!!!’ असं कॅप्शन देत क्रितीने हा फोटो शेअर केला आहे. सध्या क्रितीच्या या मादक आणि ग्लॅमरस फोटोची सोशलवर तुफान चर्चा रंगली आहे.