नाशिक – राज्यात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका महिलेला दुसरी महिला मारहाण करताना दिसते.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व्हिडीओमध्ये एक सावकार महिला दुसऱ्या महिलेला अमानुषपणे मारहाण करीत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने दंबगगिरी करत एका गरीब कुटुंबातील महिलेला आणि एका पुरुषाला जबर मारहाण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या पिंप्राळे येथे ही घटना घडली आहे. यावेळी महिलेला विवस्त्र करण्याच प्रयत्न करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक व्हिडीओ ! पैशांसाठी सावकार महिलेकडून महिलेलाच विवस्त्र करण्याचा प्रयत्न pic.twitter.com/akXwzjl12l
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) March 22, 2021
एका गरीब दाम्पत्याने संगिता वाघ नावाच्या सावकार महिलेकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. यापैकी बरीच रक्कम संगिताकडे परत केली होती. मात्र परत केलेली रक्कम केवळ व्याज होते, मुद्दल बाकी असल्याचे म्हणत संगिता वाघ हिने दाम्पत्याला मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.