नवी दिल्ली, दि.22- राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाने 81 औषधांचे मूल्य निश्चित केले आहे. यात ऑफ पेटंट मधुमेहावरील औषधांचा समावेश आहे जेणेकरून पेटंटची मुदत संपण्यापूर्वी रूग्णांना त्याचा लाभ होईल.
स्वदेशी संशोधन आणि विकास यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या नव्या औषध वितरण प्रणालीमुळे एनपीपीएने या औषधांसाठी या कंपन्यांना पाच वर्षांसाठी औषध किंमतीत सूट दिली होती. सूट दिलेल्या कालावधीत किंमतीवरील नियंत्रण लागू केले नव्हते.
सूट दिलेला कालावधी पूर्ण झाल्यामुळे या औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे इन्सुलिन इंजेक्शन, आयसोफेन इन्सुलिन, इन्सुलिन ह्यूमन इंजेक्शन यांच्या सध्याच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. आता ही औषधे जनतेला वाजवी दरात उपलब्ध होत आहेत.
एनपीपीएने 76 नव्या औषधांच्या किरकोळ किंमती निश्चित केल्या ज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादकांच्या ऑफ पेटंट मधुमेह विरोधक औषधांचा समावेश आहे. याशिवाय एनपीपीएने 2 अधिसूचित औषधांच्या किंमतीच्या कमाल मर्यादेवर बंधन आणले आहे.
प्राधीकरणाने घाऊक किंमत निर्देशांकानुसार अधिसूचित औषधांच्या विद्यमान कमाल मर्यादा किंमतीतही सुधारणा करण्यास मान्यता दिली. या सुधारीत किंमती एप्रिल 2021 पासून लागू होतील.