वाल्हे (पुणे)- पुरंदर तालुक्यात सोमवारी ६५ रुग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. २० गावातील ६१ रुग्ण, तर पुरंदर तालुक्याबाहेरील ४ रुग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी येथील शासकीय लाँबमध्ये १५८ संशयीतांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या. यापैकी ६५ रुग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील २० गावातील ६१ व तालुक्याबाहेरील ४ रुग्णांचा यात समावेश आहे.
सासवड येथील शासकीय लाँबमध्ये आज सोमवार दि. २२ रोजी १०९ तर जेजूरी येथील शासकीय लाँबमध्ये ४९ संशयीत रुग्णांचे अहवाल तपासण्यात आले. सासवड येथील १०९ पैकी ४२ रुग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. सासवड शहर २३, जवळार्जून २, भिवडी, नाझरे क.प, जेजुरी, दिवे, हिवरे, बेलसर, पिसर्वे, वाल्हे, सिंगापूर, निळूंज, पिंपळे, पांगारे, गराडे प्रत्येकी १ तर तालुका बाहेरचे वडकी, भेकराईनगर प्रत्येकी १ व पुणे बालाजीनगर २ येथील रूग्ण आढळले.
जेजुरी येथील शासकीय लाँबमध्ये आज सोमवार दि.२२ रोजी ४९ संशयीत रुग्णांचे अहवाल तपासण्यात आले. यापैकी २३ रुग्णांचे अहवाल पॉसिटीव्ह आले असून, यामध्ये जेजुरी १४, साकुर्डे २ दौंडज ३ कोळविहिरे, नाझरे क. प, भोसलेवाडी, तक्रारवाडी प्रत्येकी १ अहवाल पाँझिटिव्ह आले आहोत. ६५ अहवालां पैकी तालुक्या बाहेरील ४ तर तालुक्यातील २० गावातील ६१ रुग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत.
आज पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने, तालुक्यात चिंतेची वातावरण निर्माण झाले आहे.