पाचगणी : जावळी तालुक्यातील केळघर येथील संतोष पांडुरंग पार्टे याला २३ किलो गांजा तस्करी करत असताना पोलादपूर पोलिसांनी अटक केली.
कस्टम विभागातील पोलिस पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली. २३ किलो गांजासह रात्री पार्टेला अटक करण्यात आली.
जावळी तालूक्यात गांजा विक्रीमध्ये पार्टेसह अन्य काही जणांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाबळेश्वर- सातारा रस्त्यावरील केळघर गावात संतोष पार्टे सध्या वास्तव्यास आहे. यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी अन्य दोघांना गांजा विक्री करत असताना पकडले होते. यातून संतोष पार्टेचेही नाव समोर आल्याने पोलिसांनी संतोषवर पाळत ठेवत अटक केली आहे. संतोष पार्टेसोबत आणखी गांजा तस्कर सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.