प्रत्येक नात्याचे आपापले महत्व आहे. नातं कुठलं ही असो त्यामध्ये रुसवे फुगवे होतातच. पण प्रियकर आणि मैत्रिण अर्थात प्रेयसीचे नाते असे आहे ज्या मध्ये गैरसमज झाल्यामुळे दुरावा येतो. मैत्रिण रागावून जाते की तिला समजविण्यासाठी खुशामदी कराव्या लागतात. तरी ही मैत्रिणीचा राग काही निवळतच नाही. आज आम्ही सांगत आहोत असे काही टिप्स ज्यामुळे आपली मैत्रिण रागावली असेल तर सहज तिचा राग निवळेल. चला तर मग जाणून घेऊ या.
आपली बाजू मांडा
सर्वप्रथम मैत्रिण कोणत्या गोष्टीवरून रागावली आहे ते जाणून घ्या आणि नंतर तिला समजवा. आपण केलेली एखादी गोष्ट जर तिला आवडली नसेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करा आणि क्षमा मागायला कमी पणा येऊ देऊ नका. तिचा राग निवळेल.
माफी मागा
केलेल्या चुकीसाठी तिची माफी मागून तिचा हात धरा किंवा मिठी द्या असं केल्यानं आपण पूर्ण प्रामाणिकपणे केल्यावर तिचा राग नक्की निवळेल.
शॉपिंगला न्या
आपण प्रेयसीला खरेदीला नेऊ शकता आपण तिला विचारा की तिला काय खरेदी करायचे आहे. तिच्या आवडीची खरेदी तिला करू द्या. असं केल्यानं तिचा राग नक्की निवळेल. अनेकदा शॉपिंगचा असा जादूई परिणाम होत असतो.
कॅंडल लाईट डिनरला न्या
मैत्रिण रुसली आहे आपल्याशी काहीच बोलत नाही तर आपण आपल्या एखाद्या कॉमन मित्राच्यामार्फत तिच्याशी संवाद साधा. तिला कॅंडल लाईट डिनरसाठी एखाद्या उंची रेस्टोरंटमध्ये न्यावे किंवा घरातच कॅंडल लाईट डिनर करू शकता. असं केल्यानं आपल्या रुसलेल्या मैत्रिणीचा राग नाहीसा होईल.