रविवारी 36 अंश सेल्सिअस नोंद : सायंकाळनंतर उकाडा
15.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
पुणे – गेले दोन दिवस कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. रविवारीदेखील 36 अंश सेल्सिअसच्या घरात कमाल तापमान होते. तर, सायंकाळनंतर उकाडा वाढला होता. तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या बहुतांश भागात आणि कोकण गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
सोमवारी (8 मार्च) कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत असेल. तर, आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी सकाळी पुणे येथे 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान, 15.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. तर, लोहगाव येथे 36.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 19.9 अंश सेल्सिअस किमान तापमान, पाषाण येथे 36.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 16.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे.