कोव्हिड रुग्णाला घ्यायचा होता मोकळा श्‍वास : नेले बीचवर

बीचवर नेताना रुग्णालयातील कॉटसह सर्व वैद्यकीय उपकरणेही सोबत

मद्रिद – करोनाचा सर्वाधिक कहर गेल्या वर्षी इटली आणि स्पेनमध्ये दिसून आला होता. हजारो जणांचे मृत्यु आणि बाधितांची लक्षावधीची संख्या यामुळे या देशांना स्मशानकळा आली होती. मग संपूर्ण लॉकडाऊन आणि मग हळूहळू अनलॉक प्रक्रियेनंतर व्यवहार, जनजीवन सुरळीत होऊ लागले.

मग साधारण तीन महिन्यांपूर्वी करोनाविषाणूचा नवा म्युटेशनचा अवतार आला आणि पुन्हा एकदा जागतिक महामारीने डोके वर काढले. अशातच पुन्हा एकदा रुग्णालयात श्‍वसन विकार वाढलेल्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढू लागली.

स्पेनमधील एका रुग्णालयात भरती केलेल्या 72 वर्षीय मार्थ पस्कुएल गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह आहेत. वयोवृद्ध पस्कुएल यांना श्‍वास घेण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी डॉक्‍टरांकडे समुद्रकिनारी जाऊन मोकळा श्वास घेण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून त्यांना समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आले.

डॉक्‍टरांच्या सूचनेनुसार पस्कुएलचे कुटुंबीय आणि शेजारीही या वेळी सोबत होते. तसेच त्यांचा पाळीव श्वानही होता. पस्कुएलची तब्येत आता सुधारली असून रुग्णाच्या भावनेचा मान ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तसेच त्यांना बीचवर नेताना रुग्णालयातील कॉटसह सर्व वैद्यकीय उपकरणेही सोबत नेण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.