छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ऑफ एअर गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात त्यातील पात्र नेहमीच जिवंत राहतात. अशीच एक मालिका अर्थात “तुझ्यात जीव रंगला’! या मालिकेतील खलनायिका अर्थात “वहिनीसाहेब’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरने ही भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. मात्र, तिच्या एक्झिटनंतर आलेल्या नव्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारने देखील या पात्राचं शिवधनुष्य लीलया पेलले.
View this post on Instagram
केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर, सोशल मीडियावर देखील माधुरीच्या नावाची मोठी चर्चा असते. तिचे अनेक डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या डान्स व्हिडिओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. सोशल मीडियावर माधुरी इतकी ऍक्टिव क्वचितच एखादी अभिनेत्री राहात असेल. तिचा नुकताच “जुम्मा-चुम्मा’ या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
तिच्या नृत्य शैलीमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. तिच्या मॉडर्न लूकमधील काही व्हिडिओ व फोटोंनी तर युवा पिढीला अक्षरशः भुरळ घातली आहे. मालिकेत नेहमीच साडीवर दिसणाऱ्या माधुरीच्या या बोल्ड डान्सला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. याच कारणाने माधुरी सध्या अनेक इव्हेंट आणि इतर कार्यक्रमांसाठी अनेकांची पसंती ठरत आहे. माधुरीने या अगोदरही छोट्या पडद्यावर काम केले आहे. “झी युवा’ वरील “अप्सरा आली’ या डान्स शो आपल्या नृत्याचे जलवे दाखत ती विजेती ठरली होती.