रांची – झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या “आयईडी’च्या स्फोटात आज तीन सुरक्षा रक्षक शहिद झाले. आज सकाळच्या सुमारास टोकला पोली ठाण्याच्या हद्दीतील होयाहातू गावात झारखंड पोलिसांच्या जॅग्वार या विशेष पथकातील तीन जवान शहिद झाले.
मृतांमध्ये झारखंड जॅग्वार पथकातील एक जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 197 व्या बटालियनमधील दोन जवान या स्फोटात जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. झारखंड जग्वार पथक आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक या भागात माओवादीविरोधी कारवाईसाठी गेले असताना ही घटना घडली.
छत्तीसगडमध्येही अशाच एका घटनेमध्ये छत्तीसगड सशस्त्र दलातील जवान शहिद झाला. दंतेवाडा जिल्ह्यामध्ये प्रेशर इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्हचा स्फोट झाल्यामुळे या जवानाचा मृत्यू झाला. गेडाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या पहुरनार गावात ही घटना घडली.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलाचे संयुक्त पथक गस्त घालत होते, त्यावेळी ही घटना घडली, अशी माहिती बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिली.