नगर – जिल्ह्यात आज 176 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 74 हजार 100 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.82 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 215 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 288 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 46, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 152 आणि अँटीजेन चाचणीत 17 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 18, अकोले 14, कोपरगाव 01, नेवासा 01, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 06, संगमनेर 03, कॅन्टोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 41, अकोले 07, जामखेड 01, कर्जत 01, कोपर गाव 10, नगर ग्रामीण 11, नेवासा 04, पारनेर 04, पाथर्डी 02, राहाता 21, राहुरी 05, संगमनेर 28, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 09, कॅन्टोन्मेंट 01 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 17 जण बाधित आढळुन आले. मनपा 04, कर्जत 01, कोपरगाव 01, नेवासा 01, पारनेर 02, राहाता 02, राहुरी 02, इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा 54, अकोले 05, कर्जत 03, कोपरगाव 17,, नगर ग्रामीण 10, नेवासा 01, पारनेर 10, पाथर्डी 05, राहाता 10, राहुरी 07, संगमनेर 31, शेवगाव 09, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 02, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : 74100
उपचार सुरू असलेले रूग्ण : 1288
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1148
एकूण रूग्ण संख्या : 76536