अहमदाबाद – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी करोनाची लस घेतली. या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शास्त्री यांनी हे वृत्त फोटोसह सोशल मीडियावर पोस्ट केले.
या लशीचा पहिला डोस घेतला आहे, या विषाणूच्याविरुद्ध भारताला सशक्त बनवण्यासाठी सज्ज असलेल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांना मनापासून धन्यवाद, अशा शब्दात शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. येथील अपोलो रुग्णालयातील कांताबेन व त्यांच्या पथकाचेही शास्त्री यांनी आभार मानले.
Got the first dose of COVID-19 vaccine. Thank you to the amazing medical professionals & scientists for empowering India 🇮🇳 against the pandemic.
Extremely impressed with the professionalism shown by Kantaben & her team at Apollo, Ahmedabad in dealing with COVID-19 vaccination pic.twitter.com/EI29kMdoDF
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 2, 2021
करोनाविरुद्धचा हा लढा आपण निश्चितच जिंकू. मात्र, त्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे व करोनाबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.