पुणे – करोनाच्या साथीमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे प्रभाग क्र. तीन (अ) विमान नगर – सोमनाथ नगरमधील तसेच सर्वच ठिकाणच्या नागरिकांना लाईट बिल टप्याटप्याने भरण्याची परवानगी द्यावी. तसेच वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल भंडारे यांनी महावितरणकडे केली आहे.