चेन्नई – भारतीय संघाचा नवोदित सलामीवीर फलंदाज शुघमन गिल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानावर उतरला नव्हता. त्यामुळे भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आता त्याचाही समावेश झाल्याने भारतीय संघासमोर चिंता निर्माण झाली आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केल्यानंतर आता दोन्ही संघ अहमदाबादला रवाना होतील. तिथे उर्वरित दोन कसोटी सामने होणार असून त्यापूर्वी गिल पूर्ण फिट होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना गिल याच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून गिल याला स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिल याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गिल फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याची दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी ठरणार आहे. दुखापतीमुळे जर तो तिसऱ्या कसोटी सामन्यास खेळला नाही तर मयंक आग्रवालला रोहित शर्मासोबत सलामीला संधी मिळू शकते.