– नीलकंठ मोहिते
रेडा – इंदापूर नगर परिषदेच्या विषय समितीच्या सदस्य पदासाठी व विषय समितीच्या सभापती व महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी विशेष सभेचे आयोजन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे साहेब यांच्या आदेशान्वये एक विशेष सभा घेऊन आयोजन करण्यात आले होते.यामध्ये काँग्रेस पक्षाकडे इंदापूर नगरपालिकेत तीन समित्या सभापती पदे गेले आहेत,तर दोन सभापती पदे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे आली आहेत.
यामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांनी कामकाज पाहिले व नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी माननीय निर्मला राशिनकर यांच्या उपस्थितीमध्ये ही विशेष सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली.या सभेमध्ये विविध समित्यांसाठी निवडणूक घेण्यात येऊन खालील प्रमाणे समित्यांचे गठन करण्यात आले.
यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडे तीन समित्यांचे सभापतीपद मिळाले. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कडे दोन समित्यांचे सभापती पद मिळाले या निवड प्रक्रिया मध्ये दोन्ही पक्षांचे पक्षीय बलाबल समान असल्यामुळे चिठ्ठ्या टाकून समित्यांवर नामनिर्देशन करण्यात आले.
यामधील समित्या बांधकाम नियोजन व विकास समिती सभापती धनंजय विश्वासराव पाटील,पाणीपुरवठा व अर्थ समिती सभापती अनिता रमेश धोत्रे,स्वच्छता शेती व उद्यान समिती सभापती अनिकेत अरविंद वाघ, तर वीज व वृक्ष संवर्धन समिती सभापती सुवर्णा नितीन मखरे, महिला विकास व बालकल्याण समिती सभापती हेमलता वसंत मालुंजकर, तर उपसभापती मीना ताहेर मोमीन, याप्रमाणे समित्यांचे गठन करण्यात येऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन इंदापूर नगरपरिषदेच्या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी अनिल ठोंबरे यांनी व उपस्थित मुख्याधिकारी निर्मला राशिनकर व इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष अंकिताताई शहा उपस्थित सर्व सदस्य यांनी केले आहे.सर्व सभा कामकाज सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी चालविले.