प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने आपल्या आगामी “लायगर’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात साउथ स्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांची नवीन जोडी झळकणार आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आल्यानंतर चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी घोषण धर्मा प्रोडक्शनकडून करण्यात आली आहे. धर्मा प्रोडक्शने ट्वीट करत सांगितले की, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे याचा “लायगर’ 9 सप्टेंबर 20121 रोजी पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मलयालय या भाषेत एकचवेळी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या चित्रपटात विजय देवरकांडा नवीन अंदाजात झळकणार आहे. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असून थायलंडमध्ये मार्शल आर्टसचे ट्रेनिंगसुद्धा घेतले होते. यात विजय आणि अनन्यासह राम्या कृष्णन, रॉनित रॉय, विष्णु रेड्डी आदी कलाकारांनीही मुख्य भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram