पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या 4 भाविकांवर काळाने घाला घातला आहे. बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात पंढरपूर-सांगोला मार्गावर खर्डीजवळ घडला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत. बोलेरोचा चेंदामेंदा झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत चारही व्यक्ती कोल्हापूरमधील आहेत. कोल्हापूरच्या चंदगड याठिकाणचे ते रहिवासी असून ते पंढरपूर याठिकाणी दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.
मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या भीषण अपघातामध्ये मृतांच्या चेहऱ्याची दुर्दशा झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणंही कठीण झाले होते.