मुंबई – प्रख्यात गझल गायक ‘जगजीत सिंह’ यांचा आज जन्म दिन आहे. जगजीत सिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला होता. त्यांचं फॅन फोलोविंग अख्या जगभर पसरलंय. आज सुद्धा लोक त्यांच्या आवाजावर फिदा आहेत.
आणि याच विशेष दिनी गुगलनंही आपल्या ‘डूडल’मार्फत जगजीत सिंह यांच्या आठवणी जिवंत केल्या आहेत. १० ब्रेन हॅमरेज झाल्यानं १० ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.
आज तुम्ही गुगलच्या होम पेजवर जाल तर तुम्हाला तिथे हार्मोनियम वाजवताना दंग झालेले जगजीत सिंह दिसून येतील. जगजीत यांना “गझल सम्राट’ म्हणून ओळखले जात असत. आणि त्यांच्या याच अनमोल संगीत कलेने प्रेक्षकांना भुरळ पडली.
आजही अनेक लोक त्यांच्या आवाजावर फिदा आहेत याची प्रचिती गुगल डूजलवर जगजित सिंह यांना पाहून येतेय. गझलांची लोकांमध्ये रुची निर्माण करण्याच्या कामात जगजीत सिंह यांचा खूप मोठा वाटा आहे.