नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने पॅनकार्डचा अनिवार्य कागदपत्रांमध्ये समावेश केलेला आहे. पॅन कार्डशिवाय बँकेत खाते उघडले जावू शकत नाही तसेच आयकर विवरणपत्रही भरता येत नाही.
जर तुम्ही पॅनकार्ड बनवले नसेल तर उशीर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही मोफत पॅनकार्ड तयार करू शकता. यापूर्वी पॅनकार्ड बनविण्यासाठी मोठी प्रक्रिया होती मात्र आता, काही मिनिटांमध्येच पॅनकार्ड तुमच्या हातात मिळेल. तसेच पॅनकार्ड बविताना नकळतपणे जर तुमचा फोटो चुकला असले तर अशा स्मार्ट पद्धतीने बदलता येतो तुम्हाला तुमचा पण कार्डवरील फोटो
जाणून घ्या सोपी पद्धत
१ ) प्राप्तिकर विभागाकडून पॅनकार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला ई-फाईलिंग पोर्टलवर जाऊन ‘Instant एनएसडीएलवर क्लिक करावे लागेल त्यानंतर Application Type पर्यायावर क्लिक करा Changes or correction in existing PAN Data पर्यायाला निवडावे लागेल. यामध्ये पुढे Individual ऑप्शन निवडा.
२ ) यानंतर आता तेथे मागितलेल्या सर्व कागपत्रांची पुष्टी करा. यानंतर तेथे फोटो बदल करण्यासाठी Photo Mismatch पर्यायाला निवडा. या दरम्यान, मागितलेली सर्व माहिती अचूक भरा. ही माहिती भरल्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर अर्जदार ओळख प्रमाणपत्र, पत्ता पुरावा आणि जन्माचा पुरावा जोडा. यानंतर Declaration वर टीक करून Submit बटणावर क्लिक करा . फोटो आणि सिग्नेचरमध्ये बदल करण्यासाठी अर्ज फी भरावी लागेल. हा शुल्क भारतीयांसाठी 101 रुपये (जीएसटीसह) आणि भारताबाहेरील 1011 रुपये आहे.
३) पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 15 अंकांची पावती मिळणार, अॅप्लिकेशन प्रिंटआउट आयकर पॅन सेवा युनिटला पाठवा. पावती क्रमांकाद्वारे अर्जाला ट्रॅक घेतला जाऊ शकतो.