दुबई – उजव्या पायाच्या घोट्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर अद्याप पूर्ण तंदुरुस्त ठरला नसल्याने स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
20 ग्रॅंडस्लॅम विजेता असलेला फेडरर पुढील मोसमासाठी तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याच्या उजव्या पायाच्या घोट्यावर दोन शस्त्रक्रियादेखील झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियन स्पर्धेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. फेडरर सध्या दुबई येथे सराव करत आहे.
या स्पर्धेसाठी यंदाच्या मोसमात आश्वासक कामगिरी केलेल्या पाच वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या अँडी मरे याला वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे.