सध्याचे दिवस लाटेवर स्वार होण्याचे आहेत. बॉलीवूडमध्येही अशा “लाटा’ येताना दिसतात. कुटुंबप्रधान चित्रपटांची लाट, प्रेमत्रिकोणांची लाट किंवा एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपटांचा प्रवाह मागील काळात बॉलीवूडमध्ये येऊन गेला.
View this post on Instagram
सध्या सिनेसृष्टीत लाट आहे ती रिमेक आणि सिक्वलची. एका बाजूला जुन्या चित्रपटांचे रिमेक बनवून प्रेक्षकांना आकर्षित केले जात आहे; तर दुसऱ्या बाजूला सुपरहिट झालेल्या चित्रपटांचे सिक्वल बनवण्याचा उद्योगही तेजीत आहे. मात्र रिमेक बनविलॆल्या काहीच चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
View this post on Instagram
तर काही या चित्रपटाचे मॉडर्न व्हर्जन बनवण्याचा बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शकांना महागात पडतो. याचेच एक उदाहरण म्हणजे नुकताच रिलीज झालेला कुली नंबर १.
१९९५ साली गाजलेला ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरही तो सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाला १० पैकी १.३ रेटिंग मिळालं आहे.
View this post on Instagram
आयएमडीबी (IMDb) : आयएमडीबी हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यावर चित्रपट पाहणारे चाहते एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात. येथे स्टार्स पद्धतीवर कोणत्याही कलाकृतीला रेटिंग दिलं जातं. १० हे सर्वाधिक रेटिंग समजलं जातं. या प्लॅटफॉर्मवर चित्रपट, मालिका, बेस सिरीज, व्हिडिओ गेम्स अशा सर्वच गोष्टींना रेटिंग देता येतं. याचा फुलफॉर्म आहे इंटरनेट मुव्ही डेटाबेस आहे.