मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ (super stat rajinikanth) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शुक्रवारी (दि. 25) हैद्राबातमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता.
View this post on Instagram
मात्र नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार, तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर आता रविवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे खूपच चांगल्याप्रकारे स्वागत केले.
View this post on Instagram
रजनीकांत यांची पत्नी लता यांनी घरी आल्यानंतर त्यांचे औक्षण केले. त्यांच्या पत्नीने त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आणि त्यांची आरती ओवाळली. रजनीकांत हैद्राबादवरून थेट चेन्नईला त्यांच्या घरी आले आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी, अपोलो रुग्णालयानं नुकतंच एक मेडिकल बुलेटीन जारी केलं असून यामध्ये रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली गेली.
View this post on Instagram
डॉक्टरांच्या माहितीनुसार ‘थलैवा’च्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. त्यांच्या चाचणी अहवालांमध्ये कोणतीही चिंतेची बाब नाही. तसेच, रजनीकांत यांना उच्च रक्तादाबाशिवाय इतर कोणताही त्रास नसल्याचे काल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते.