मुंबई – मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला काय उखडून घ्यायचे ते घ्या, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान दिले. त्याचबरोबर हे सरकार पाडण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचलला असून त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्ज प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने (ED) संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत व्यक्तीगत आणि पक्षाची याबाबतची भूमिका मांडली.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचे काही मध्यस्थ गेल्या महिन्यापासून मला भेटत आहेत. महाराष्ट्रातील सरकार टीकू देऊ नका. आमची यंत्रणा त्यासाठी काम करत आहेत. सीबीआय, इडी आणि आयकर विभागाला हाताशी धरून हे सरकार महिन्याच्या आत पाडणार आहोत. पण मी त्यांचा बाप असल्याने त्यांच्या धमकावण्याला मी भीक घलती नाही.
आम्ही सरकरमधील 22 आमदारांची यादी बनवली आहे. त्यांना इडीकडे बोलावून त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेणार आहोत. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकन आहे, असे या हस्तकांनी मला सांगितले. पण हे सरकार पडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावे, असेही राऊत यांनी ठणकावले.