नवी दिल्ली – शेतकरी निदर्शने करत असलेल्या सिंघू सीमेला दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एम. श्रीवास्तव यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी त्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या.
सिंघू सीमेवरील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सामान्य आहे. सध्यातरी काही तरी अनुचित घडण्याजोगी परिस्थिती नाही. पण आम्ही काळजी घेत आहोत आणि पुरेसा बंदोबस्त तैनात करत आहोत. आमचा सर्व दले आणि यत्रणांशी उत्तम समन्वय आहे. आम्ही माहितीची देवाण घेवाण करत आहोत, असे श्रीवास्तव यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.