पुणे – पूर्वी असलेल्या प्रेम संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलेल्या व्यक्तीस न्यायालयाने 25 हजाराचा जामीन मंजुर केला आहे.
इक्बाल कलीम मोमीन (वय 29, रा. खडकवासला) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत 23 वर्षीय विवाहितेने सिंहगडरोड पोलिसात फिर्याद दिली आहे.
ही घटना 10 मे 2020 रोजी पहाटे 5 च्या सुमारास नऱ्हे भागात घडली. या प्रकरणात पोलिसांनी मोमीन याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.
पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुन्हा अशा स्वरूपाचा अथवा इतर कोणताही गुन्हा न करणे या आणि अशा विविध अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला.