डिसेंबर महिना सुरु झाला की, सर्वांना वेध लागतात ते नव्या वर्षाचे आणि त्यापाठोपाठ नव्या वर्षात कोणता सण केव्हा येतोय, कोणत्या सुट्टया केव्हा येताहेत आणि शनिवार-रविवारला जोडून कोणत्या सुट्टया येतात तर कोणत्या सुट्टया बुडतात. चला तर पाहूया तुम्हाला तुमचा लॉंग विकएंड कधी प्लॅन करता येईल ते…
येत्या वर्षाची सुरुवात शुक्रवारने होणार आहे. त्यानंतर वर्षातील पहिली शासकीय सुट्टी जानेवारीला मिळणार आहे. तर पहिला लॉंग विकेन्ड फेब्रुवारी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून नुकतीच वर्ष मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी जाहीर झाली आहे. येत्या वर्षात कोणते सण कोणत्या तारखेला आले आहेत. तुम्हाला कधी लॉंग विकेन्डची संधी मिळू शकते. त्यानुसार तुम्ही सुट्टीचा प्लॅन करु शकता.
शनिवारी आणि रविवारी आलेले सण
1. रविवार – 14 एप्रिल – महावीर जंयती
2. शनिवार – 1 मे – महाराष्ट्र दिन/कामगार दिन
3. रविवार – 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
4. शनिवार – 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
5. शनिवार – 25 डिसेंबर – ख्रिसमस
दिवस, तारीख आणि सुट्टी या क्रमाने…
1. मंगळवार – 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
2. शुक्रवार- 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
3. गुरुवार – 11 मार्च – महाशविरात्री
4. सोमवार – 29 मार्च (दुसरा दिवस) होळी
5. शुक्रवार – 2 एप्रिल – गुड फ्रायडे
(शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्टी)
6. मंगळवार – 13 एप्रिल – गुढीपाडवा
7. बुधवार – 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
8. बुधवार – 21 एप्रिल – रामनवमी
9. गुरुवार – 13 मे – रमझान ईद
10. बुधवार – 26 मे – बुद्ध पोर्णिमा
11. बुधवार – 21 जुलै बकरी ईद
12. सोमवार – 16 ऑगस्ट – पारशी नववर्ष
(शनिवार, रविवार, सोमवार सलग सुट्टी)
13. गुरुवार – 19 ऑगस्ट – मोहरम
14. शुक्रवार – 10 सप्टेंबर – गणेश चतुर्थी
15. रविवार – 19 सप्टेंबर – अनंत चतुर्दशी
16. शुक्रवार – 15 ऑक्टोबर – दसरा
(शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्टी)
17. मंगळवार – 19 – ऑक्टोबर – ईद ए मिलाद
18. गुरुवार – 4 नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)
19. शुक्रवार – 5 नोव्हेंबर दिवाळी (बलिप्रतिपदा)
(गुरुवार ते रविवार 4 दिवस सुट्टी )
20. शुक्रवार – 19 नोव्हेंबर – गुरुनानक जयंती
(शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्टी)